पाथर्डी : येथील महावितरण कार्यालयाला आ. मोनिका राजळे यांनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास टाळे ठोकले. वीज बिल न भरल्याने महावितरणकडून सध्या वीज पुरवठा खंडित करणे सुरू आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांच्या हिताची असणारी सिंगल फेज योजनाही बंद केली. हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे काय, असा सवाल आ. राजळे यांनी केला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, पं. स. सभापती गोकुळ दौंड, जि. प. सदस्य राहुल राजळे, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुभाष केेकाण, सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, चारुदत्त वाघ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, मंगल कोकाटे, बजरंग घोडके, अनिल बोरुडे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, बबन बुचकुल, ॲड. संपत गर्जे, डॉ. सुहास उरणकर,
वसंत पवार, बाळासाहेब अकोलकर, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, प्रमोद भांडकर आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ पाथर्डी आंदोलन
पाथर्डी येथील महावितरण कार्यालयाला आ. मोनिका राजळे यांनी शुक्रवारी टाळे ठोकले.