ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १३ - प्रकृती बिघडल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा नियोजित राळेगणसिद्धीचा दौरा रद्द करण्यात आला आह़े ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज ठाकरे शनिवारी भेट घेणार होते.
मात्र, शुक्रवारी सकाळीच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला ठाकरे यांना दिला आह़े त्यामुळे हा दौरा रद्द करुन पुढील आठवडय़ात भेटीचे नियोजन करण्यात येईल, असे ठाकरे यांच्या कार्यालयाकडून अण्णांच्या कार्यालयाला कळविण्यात आले आह़े