शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
6
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
7
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
8
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
9
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
10
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
11
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
12
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
13
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
14
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
15
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
16
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
17
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
18
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
19
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
20
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

टंचाई आढावा बैठकीत शेवगावला तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:02 IST

शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मूलभूत विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला.

शेवगाव : शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मूलभूत विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान विविध विभागाच्या अधिका-यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेली. तर आमदार राजळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.पिण्याचे पाणी, रेंगाळलेली जलयुक्त शिवार व जलसिंचनाची कामे, वीज, सार्वजनिक रस्ते, रोजगार हमीची कामे आदी रेंगाळलेल्या मुलभूत समस्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी आगाऊ सूचना देऊनही बैठकीत सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागात समन्वयाचा अभाव दिसून आल्याने आमदारासह प्रांताधिकारी, तहसीलदार, आदींनी सर्वांनी मिळून टंचाईचा सामना करणे आवश्यक असताना जबाबदार अधिकारी अशाच पद्धतीने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणार असतील तर टंचाई आढावा बैठक काय कामाच्या? असा सवाल करून आजच्या बैठकीतील तक्रारींबाबत तातडीने निपटारा झाला नाही तर संबंधितावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल, असा सज्जड दम भरला.यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उच्चांकी तापमानामुळे शेवगाव तालुक्यात आतापासूनच अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील चेडे चांदगाव, आखेगाव, बेळगाव, ठाकूर पिंपळगाव, शोभानगर, मुरमी, बाडगव्हाण आदी गावात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. अनेक गावात हातपंप नादुरुस्त आहेत. शहर टाकळी व चोवीस गावच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकबाकीच्या कारणावरून दीर्घकाल बंद आहेत. नागलवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेच्या पाझरतलाव, नवीन साठवण बंधारा आदी रेंगाळलेल्या कामांना चालना देण्याची मागणी करण्यात आली. खरडगाव येथील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दिवे रात्रंदिवस सुरु आहेत. याबाबत माहिती देऊनही कार्यवाही होत नाही. शोभानगर येथील वीज पुरवठा केबल वायर जळाल्याने सध्या बंद आहे. गावात हरिनाम सप्ताह सुरु असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरु व्हावा. अनेक गावात सार्वजनिक रस्त्याची दुरवस्था झाल्याने जरी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला तर गावात टँकर येण्यास अडचणी येणार असल्याने याबाबत रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे. टंचाईसदृश्य गावातील अनाधिकृत पाणी उपशाबाबत संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी नोंदविण्यात आली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMonika Rajaleआ. मोनिका राजळेShevgaonशेवगाव