अहमदनगर- रविवारी रात्री अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने नेवासा, नगर भागातील पिकांना फटका बसला. उसालाही चांगलेच नुकसान झाले. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असला तरी खरिपाच्या दृष्टिने हा पाऊस चांगला झाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता.कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला तयार झालेल्या वादळाने दक्षिण व उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार नगर शहर व जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला.नगर, नेवासा, पारनेर, राहुरी आदी भागात चांगला पाऊस झाला. सध्या शेतात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकालाच चांगला फटका बसला. नेवासा तालुक्यात वादळी पावसाने उसाचे पीक आडवे झाले. या भागाला रविवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले.------------------फोटो-पिंपरी शहाली येथील सचिन नवथर यांच्या शेतातील उसाचे पीक आडवे झाले.
नगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, सोमवारी पहाटे सहापर्यंत पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 10:38 IST