शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस ओसरला

By admin | Updated: August 8, 2014 00:18 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे़

अहमदनगर : अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आले आहेत़ धरण पाणलोटातही पाऊस पडला़ मात्र जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून, बुधवारी सरासरी १ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे़गेल्या दोन महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात जुलैअखेर हजेरी लावली़ उशिराने का होईना पण पावसाचे आगमन झाले़ पावसाच्या आगमनाने सर्वच सुखावले़ कमीअधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत पाऊस सुरू झाला़ तुलनेत मुळा व भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली़ त्यामुळे भंडारदार धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहेत़ तर मुळा धरण ६१ टक्के भरले आहे़ दोन्ही धरणांत पाण्याची आवक सुरूच आहे़ असे असले तरी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही़ अकोल तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला़ उर्वरित तालुक्यांत हलक्या सरींचा पाऊस झाला़ मध्यंतरी पावसाचा जोरही वाढला होता़ परंतु आता तो ओसरला असून, जिल्ह्यात काल बुधवारी १़ ५७ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़जून पूर्णपणे कोरडा गेला़ जुलैअखेर पावसाचे आगमन झाले़ परंतु पावसाचा जोर नव्हता़ कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला़ परंतु आता तर तोही गायब झाला आहे़ अकोले वगळता इतर तालुक्यांत १ मि़मी़ पावाची नोंद झाली असून, जिल्ह्यात पाऊस ओसरला असल्याचे यावरून दिसून येते़ त्यामुळे आॅगस्टही कोराच जाणार की काय,अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे़(प्रतिनिधी)जिल्ह्यात ३३६ टँकरजिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा सुरूच आहे़सर्वाधिक पाऊस झालेल्या अकोले तालुक्यातील टँकर बंद झाले असून, उर्वरित ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात टँकर सुरू आहे़ टँकरची संख्या ३३ ने कमी झाली असून, सध्या ३३६ टँकर सुरू आहे़पावसाची नोंदअकोले- १५, संगमनेर-०, कोपरगाव- २, श्रीरामपूर-०, राहुरी- ०, नेवासा- १, राहता- ०, नगर- १, शेवगाव- २, पाथर्डी-०, पारनेर-०, कर्जत-०,श्रीगोंदा- ०, जामखेड-१ मिमी पावसाची नोंद आहे़