शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

पाऊस गायब; पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:46 IST

पुढील पाच दिवस पाऊस दांडी मारणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.

राहुरी : पुढील पाच दिवस पाऊस दांडी मारणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृ षी विद्यापीठाने हवामानानुसार पिकांवर औषध फवारणीचा सल्ला दिला आहे़ रोग-किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.हवामान अंदाजावर आधारित राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे़ हुमणीचा ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे़ हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ०़३ टक्के दाणेदार कीटकनाशक ३३ किलो प्रति हेक्टर या प्रमाणावर पसरावे़ कपाशीचे पीक ७० दिवसांचे झाल्यानंतर शेंडे खुडावेत़ त्यामुळे वाढ होऊन फलधारणा होईल़ पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना ७५ मिली १० लीटर पाण्यात मिसळून कपाशीवर फवारणी करावी़ बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एच़एऩपी़व्ही़ हे जैविक विषाणू हेक्टरी ५०० एल़ ई़ १५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ज्वारी पिकावर मावा तुडतुडे याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्हर्टीसिलीयम लेकॅनी ७५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला कृ षी विद्यापीठाने दिला आहे़ सोयाबीन पिकातील मोठमोठे तण हाताने काढून घ्यावे़ सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनीलीप्रोल १८़५ टक्के प्रवाही ३ मिली, प-ल्युबेन्डामाईड ३९़३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा लफेनुरॉन ५़४ टक्के प्रवाही १२ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारावे, असा सल्ला देण्यात आला आहे़कांद्यावरील करपा व टाक्या यांच्या एकत्रित रोग व कीड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर ३० गॅ्रम डायथेन एम-४५ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इ़सी १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आर्द्रता ७४ ते ७७ टक्के राहील. किमान आर्द्रता ४९ ते ५७ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी