शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरवर छापा; नशेत तर्रर्र झालेले अठरा जण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 20:29 IST

अहमदनगर:  नगर-दौंड रोडवरील हॉटेल फूडलँड येथे नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून नशेत तर्रर्र असलेल्या अठरा ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.

अहमदनगर:  नगर-दौंड रोडवरील हॉटेल फूडलँड येथे नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून नशेत तर्रर्र असलेल्या अठरा ग्राहकांसह हॉटेल व्यवस्थापकाला ताब्यात घेतले.

शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलचे मालक सतीश किसनराव लोटके, हॉटेलचा व्यवस्थापक अरुण बाबासाहेब ढमढेरे, यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अठरा जणांमध्ये दोन तरुणींचाही समावेश आहे. या हॉटेलमध्ये बंद दाराआड हुक्का पार्लर आणि दारू विक्री सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशय आल्याने हॉटेलची तपासणी केली तेव्हा आतमध्ये बेधुंद पार्टी रंगली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनेक तरूण हे नगर शहरातील उच्चभ्रू घरातील आहेत.

कोरोनाच्या काळात सध्या पाच वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. हॉटेल मालक असलेला हा नाट्यकलावंत बहाल करत असलेला 'एकच प्याला' पिण्यासाठी आणि हुकक्याचा कश ओढण्यासाठी येथे रोजच मोठी गर्दी असायची. पोलिसांच्या कारवाईमुळे मात्र या हॉटेलमधील अवैद्य व्यवसायाचा भंडाफोड झाला आहे.