शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत चक्काजाम, जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:03 IST

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे शेतीसह व्यापर ठप्प झाला असून राहुरीचा आठवडे बाजार बंद होता़ राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ, सत्यानारायण घालण्यात आला. राहुरी, कृषि विद्यापीठ, कोल्हार खुर्द, राहुरी फॅ क्टरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.

राहुरी : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे शेतीसह व्यापर ठप्प झाला असून राहुरीचा आठवडे बाजार बंद होता़ राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ, सत्यानारायण घालण्यात आला. राहुरी, कृषि विद्यापीठ, कोल्हार खुर्द, राहुरी फॅ क्टरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.राहुरी तालुक्यातील ९६ गावे बंदमध्ये सहभागी झाली होती़ राहुरीतील आंदोलनात माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह देवेंद्र लांबे, सत्यवान पवार, शिवाजी डौले, गणेश खेवरे, राहुल शेटे, अरूण तनपुरे आदी सहभागी झाले होते़ राहुरी फॅक्टरी ते राहुरी यादरम्यान मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़ जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला़ शिस्तबध्द रित्या चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले़ नगरकडे जाणा-या रूग्णवाहीकांना आंदोलकांनी रस्ते खुले करून आले़ वाहतूक पुर्णपणे विस्कळीत झाली होती़ राहुरीचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला़ राहुरी तालुक्यातील व्यापारी, विविध स्वयंसेवी संघटना व संस्थानी बंदला पाठींबा दिला़ शाळा, महाविद्यालये, पतसंस्था, बँका, सहकारी सोसायट्या आज बंद आहेत. शेतमजुरही शेतात फिरकले नाही़ त्यामुळे शेतीची कामेही ठप्प झाली होती़ अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू होत्या़ राहुरी बस स्थानकावरून एकही बस धावली नाही़ खाजगी वाहनेही बंद असल्याने अनेकांची गैरसोय निर्माण झाली़ राहुरी तालुक्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असल्याची माहीती मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिली़ सर्वांनी आंदोलनाला पाठींबा दिल्याचे लांबे यांनी सांगितले़ अनिल येवले यांनी आंदोलन यशस्वी केल्याबददल सर्वांना धन्यवाद दिले़ राहुरी तालुक्यात ७० पोलिस तैनात करण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली .

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी