निघोज : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव सुकाळे, भाऊसाहेब सुकाळे, रेवुजी चौधरी, काशीनाथ वाजे, पांडुरंग पवार, विकास वाजे यांच्या नेतृत्वात गुरुदत्त जनसेवा पॅनलने सत्ता राखली. येथे सरपंचपदी राहुल शिवाजी सुकाळे तर उपसरपंचपदी पूनम महेंद्र खुपटे यांची निवड झाली.
सरपंचपदासाठी सुकाळे गटाकडून राहुल सुकाळे तर उपसरपंचपदासाठी पूनम खुपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटाकडून सरपंचपदासाठी मनिषा बाबर आणि शोभा येवले तर उपसरपंचपदासाठी संतोष पवार व शैला जगदाळे यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी शोभा येवले आणि शैला जगदाळे यांनी अर्ज मागे घेतले. सरळ लढतीमध्ये राहुल सुकाळे आणि पूनम खुपटे यांना प्रत्येकी सहा मते मिळाल्याने दोन्हीही उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश पळसे यांनी जाहीर केले. ग्रामसवेक हरिश्चंद्र काळे यांनी कामकाजात मदत केली.
यावेळी स्वाती नऱ्हे, रेखा येवले, रमेश वाजे, आशाबाई चौधरी, मनिषा बाबर, शोभा येवले, संतोष पवार, शैला जगदाळे, राहुल बाबर आदी सदस्य उपस्थित होते.
फोटो १४ राहुल सुकाळे, पूनम खुपटे