शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

बाळासाहेबांच्या विरोधानंतरही राधाकृष्ण विखेंची भाजपला मदत : अशोक विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:33 IST

दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या.

अहमदनगर: दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या. शिवसेनेत जाण्याचा प्रस्ताव त्यांचाच होता. विरोधी पक्षनेते असतानाही ते भाजपात उपमुख्यमंत्री बनायला निघाले होते. बाळासाहेबांनीच त्यांना थांबविले होते. मात्र, या माणसाने अखेर जातीयवादी पक्षांची साथ केलीच. ही बाळासाहेब विखे यांच्या विचाराशीही प्रतारणा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी केली आहे.अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात उघड राजकीय भूमिका घेतली आहे. नगर मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या प्रचारात सहभागी होत शरद पवार यांच्यासमोर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राधाकृष्ण यांच्यावर टीका केली होती. गुरुवारी ते श्रीरामपूर येथे कॉंग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते.या सभेत ते म्हणाले, मंत्रिपद मिळत होते म्हणून राधाकृष्ण हे शिवसेनेत गेले. पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. कॉंग्रेसने त्यांना मंत्रिपद दिले. विरोधी पक्षनेतेपदाचा सन्मान दिला. मात्र, या पदावर असतानाच ते भाजपच्या संपर्कात होते. मध्ये ते भाजपमध्येही चालले होते. तेथे त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, मी आयुष्यभर जातीयवादी पक्षांना विरोध केला असल्याचे सांगत दिवंगत बाळासाहेब विखे यांनी त्यांना थांबविले. मात्र, स्वार्थासाठी राधाकृष्ण यांनी आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवत भाजपशी घरोबा केलाच. शरद पवार व आमच्या कुटुंबाचे काहीही वैर नाही. राधाकृष्ण हे तसा दिखावा निर्माण करत आहेत.बाळासाहेब थोरात यांनी पक्षनिष्ठा बाळगून दोन वेळा शालिनी विखे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. एकदा तर राधाकृष्ण विखेंनी आश्वासन देऊनही हे पद थोरात गटाला दिले नाही. त्यांचे संपूर्ण राजकारण हे स्वार्थी व अविश्वासाचे आहे, असे अशोख विखे पाटील या सभेत म्हणाले.मुळा प्रवरा वीज संस्थेत घोटाळा आहे. मात्र, हे सरकार तक्रारींची दखल न घेता याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019