शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मुळा पाटबंधारे उपविभागीय कार्यालय जाळले

By admin | Updated: March 27, 2017 16:11 IST

नेवासा तालुक्यातील घोडेगाव व चिलेखनवाडी येथील मुळा उजवा कालवा पाटबंधारेचे उपविभागीय कार्यालय रविवारी रात्री जाळण्यात आले

घोडेगाव (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील घोडेगाव व चिलेखनवाडी येथील मुळा उजवा कालवा पाटबंधारेचे उपविभागीय कार्यालय रविवारी रात्री जाळण्यात आले आहे़ याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही़शेतीसाठी चारीचे पाणी घेतलेल्या शेतकºयांना पोलिसांनी जबर मारहाण केली होती़ त्यानंतर पाटबंधारे विभागाने त्याच शेतकºयांवर गुन्हे दाखल केले होते़ त्यामुळे या संतप्त शेतकºयांनीच या कार्यालयांना आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़ रविवारी रात्री घोडेगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला दोन अज्ञान इसमांनी आग लावली़ रात्रपाळीचे रखवालदार नाना वैरागर , बाबासाहेब भासार यांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली़ मात्र, तोपर्यंत कार्यालयातील काही कागदपत्र, वायरींग व दरवाजे काही प्रमाणात जळून कार्यालयाचे नुकसान झाले़ रखवादार वैरागर व भासार यांनी उपअभियंता अशोक साळुंके यांना माहिती दिली़ साळुंके यांनी फोन करुन पोलीस हवालदार गणेश साठे यांना याबाबत कळविले़ त्यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले़ मात्र, तोपर्यंत जाळपोळ करणारे पसार झाले होते व आगही विझविण्यात आली होती़ जाळपोळीचा तिसºयांदा प्रकार - मुळा वसाहतीमध्ये कार्यालय जाळण्याचा हा प्रकार तिसºयांदा घडला आहे. पहिला प्रकार : उपअभियंता सोनवणे यांच्या काळात रेकॉर्ड रूम जाळण्याचा प्रकार घडला होता़ दुसरा प्रकार : घोडेगाव येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलन केले होते़ पाटबंधारे विभागाने त्यावेळी आडमुठेपणाचे धोरण घेतल्यानंतर शेतकºयांनी कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता़तिसरा प्रकार : रविवारी रात्री मुख्य कार्यालयाच्या दोन दरवाजांवर बाटलीतून पेट्रोल टाकून कार्यालय पेटवून देण्यात आले़