शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात लुटणा-या टोळीचे राज्यभर रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 11:21 IST

पोलीस बंदोबस्तात तोतयेगिरी करीत कधी अधिकारी तर, कधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असल्याचा आव आणून व्यापाऱ्यांना गंडविणाºया टोळीचे रॅकेट राज्यभर पसरले आहे

श्रीगोंदा : पोलीस बंदोबस्तात तोतयेगिरी करीत कधी अधिकारी तर, कधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असल्याचा आव आणून व्यापाऱ्यांना गंडविणाºया टोळीचे रॅकेट राज्यभर पसरले आहे. श्रीगोंद्यात या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पाथर्डीतही असाच प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता हे प्रकरण विधानसभेत गाजणार आहे.भेसळयुक्त व बनावट माल दुकानात ठेवल्याच्या नावाखाली राज्यातील सुमारे दोनशे व्यापाºयांना लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार जामखेड येथील अभय बाफना असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. तो जामखेड येथील व्यापारी आहे. त्याने व्यापाºयांच्या विक पॉर्इंटचा अभ्यास केला. भेसळ व बनावट मालाच्या नावाखाली दुकानदारांना लुटण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची नामी शक्कल त्याने लढविली. पोलिसांना आम्ही सामाजिक संस्थांसाठी काम करीत असून तुम्हाला दोन नंबरचा माल पकडून देतो, असे आमिष दाखवत पोलीस यंत्रणा गळाला लावली. लुटीचा डाव यशस्वी झाला की, पोलिसांना मलिदा मिळू लागला. त्यामुळे पोलिसही या टोळीच्या प्रेमात पडले. त्यातून खºया पोलिसांना सोबत घेऊन या तोतयांनी अनेक व्यापाºयांना गंडा घातला. एका व्यापाºयाला लुटण्याच्या मोहात अभय बाफना, कुंदनसिंह काहाटे श्रीगोंद्यात पकडले गेले. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने चार पोलिसांचा बंदोबस्त घेऊन व्यापाºयास गंडविले. पण आपलेच पोलीस बांधव या प्रकरणात सापडणार हे लक्षात येताच पोलिसांनी या भामट्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली नाही. त्यामुळे या तोतयांच्या टोळीचे जास्तच फावले.पोलीस बंदोबस्तात व्यापाºयांना लुटण्याच्या घटनांमुळे राज्यातील व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आमदार राहुल जगताप, आमदार मोनिका राजळे यांची भेट घेऊन या प्रकरणात भामट्यांना साथ देणाºया पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण विधानसभेत गाजणार निश्चित आहे.पोलिसांनी कारवाई करण्याची गरजनगर जिल्ह्यातील पोलिसांनी या टोळीला मदत केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकरंजनकुमार शर्मा यांनी या टोळीला पोलीस बंदोबस्त कसा दिला? कोण कोण पोलीस गेले? याची माहिती घेऊन संबधितांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर