शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मसापच्या अध्यक्षपदी रावसाहेब कसबे

By admin | Updated: April 26, 2016 23:24 IST

अहमदनगर : अध्यक्षपदी संगमनेर येथील डॉ़ रावसाहेब कसबे यांची तर विश्वस्तपदी ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांची वर्णी लागली आहे़

अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेत नगरला प्रथमच संधी देत अध्यक्षपदी संगमनेर येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ़ रावसाहेब कसबे यांची तर विश्वस्तपदी ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांची वर्णी लागली आहे़ मसापच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात दोन दिवसांपूवी नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक झाली़ या बैठकीला संस्थेचे सदस्य जयंत येलूलकर व कवी चंद्रकांत पालवे उपस्थित होते़ संस्थेत तीन मुख्य विश्वस्तांपैकी दोन जागांवर माजी आमदार उल्हास पवार व भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ शिवाजी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले़ यावेळी विश्वस्तपदी यशवंतराव गडाख यांची निवड करावी, अशी आग्रही मागणी मसापच्या सावेडी शाखेचे कार्यवाहक जयंत येलूलकर यांनी केली़ येलूलकर यांनी सभेत गडाखांच्या नावाचा ठराव मांडून त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले़ या ठरावाला मसापचे येथील सदस्य चंद्रकांत पालवे यांनी अनुमोदन दिले़ या ठरावाला उपस्थितांनी मंजुरी देत गडाख यांच्या नावावार एकमत झाले़ दरम्यान, या सभेत बोलताना येलूलकर यांनी कार्यकारिणीच्या ठराविक अंतराने होणाऱ्या सभा केवळ पुणे येथे न घेता विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्याची सूचना मांडली़ त्यामुळे स्थानिक साहित्यिक, रसिक व सभासदांना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल़ तसेच ग्रामीण भागात साहित्य चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने मदत होईल, असे येलूलकर म्हणाले़ त्यांच्या सूचना सभेत मान्य करण्यात आल्या़ (प्रतिनिधी)