शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव विद्यालयानजीक रस्त्यावर गतिरोधक टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याचे डांबरीकरण काम करण्यात आल्याने या मार्गावरील रहदारी ...

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याचे डांबरीकरण काम करण्यात आल्याने या मार्गावरील रहदारी वाढली आहे. त्यामुळे तळेगाव दिघे चौफुली परिसरातून वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याच दरम्यान तळेगाव दिघे विद्यालय व प्राथमिक शाळा असल्याने नजीकच्या डांबरी रस्त्यावर गतिरोधक बसवावेत व शाळा असल्याबाबत दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी केली आहे.

तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याचे डांबरीकरण काम तळेगाव परिसरात नुकतेच करण्यात आले. त्यामुळे या डांबरी रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच डांबरी रस्त्यानजीक न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर या डांबरी रस्त्यावरून विद्यार्थ्यांची ये - जा सुरु असते. तळेगाव विद्यालय व प्राथमिक शाळेनजीकच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तळेगाव दिघे विद्यालय व प्राथमिक शाळेनजीक डांबरी रस्त्यावर त्वरित गतिरोधक बसवावेत व नजीक शाळा असल्याबाबत दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी केली आहे.

..............................

अन्यथा आंदोलन

तळेगाव विद्यालय व प्राथमिक शाळेनजीक रस्त्यावर एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला सबंधित विभाग जबाबदार असेल. याठिकाणी डांबरी रस्त्यावर त्वरित गतिरोधक बसवावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी दिला आहे.