शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का

By admin | Updated: October 5, 2016 16:02 IST

जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे.

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. ५ -  जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीमध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे. यात विद्यमान सभापती शरद नवले भाग्यवान ठरले असून, त्यांचा गट खुला झाला आहे.अध्यक्ष मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तसेच बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मिरा चकोर या सभापतींचे गट आरक्षित झाले आहेत. याशिवाय बाळासाहेब हराळ, अ‍ॅड. सुभाष पाटील, संभाजी दहातोंडे यांचे गट महिलांसाठी राखीव झाले आहेत, तर काही सदस्यांच्या गटातील हक्काचे गाव आणि मतदार अन्य गटांना जोडले गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गटनिहाय आरक्षण असे :

अकोले तालुका :समशेरपूर- सर्वसाधारण महिला, देवठाण- सर्वसाधारण, धामणगाव आवारी : सर्वसाधारण, राजूर- सर्वसाधारण महिला, सातेवाडी- सर्वसाधारण, कोतूळ- सर्वसाधारण.

संगमनेर तालुका : समनापूर- सर्वसाधारण, वडगाव पान- सर्वसाधारण, आश्वी बु. - सर्वसाधारण महिला, जोर्वे - अ.जमाती महिला, घुलेवाडी : सर्वसाधरण, धांदरफळ - ना.मा.प्र., संगमनेर खुर्द - ना.मा.प्र., बोटा - ना.मा.प्र., राजूर - सर्वसाधारण महिला.कोपरगाव तालुका : सुरेगाव - सर्वसाधारण, ब्राह्मणगाव - सर्वसाधारण महिला, वारी - अ.जा.महिला, शिंगणापूर - सर्वसाधारण, चांदेकसारे - ना.मा.प्र. महिला.

राहाता तालुका : पुणतांबा - अ.जमाती, वाकडी - ना.मा.प्र. महिला, साकोरी - सर्वसाधारण महिला, लोणी खु. - ना.मा.प्र. महिला, कोल्हार बु. - अनुसुचित जमाती.

श्रीरामपूर तालुका : उंदीरगाव - अनुसूचित जमाती महिला, टाकळी भान - अनुसूचित जमाती महिला, दत्तनगर - सर्वसाधारण महिला, बेल्हापूर - सर्वसाधारण.

नेवासा तालुका : बेलपिंपळगाव - सर्वसाधारण, कुकाणा- ना.मा.प्र. महिला, भेंडा बु.- ना.मा.प्र., भानसहिवरे- अ.जा. महिला, खरवंडी- ना.मा.प्र., सोनई- अ.जा.महिला, चांदा- ना.मा.प्र. महिला.

शेवगाव तालुका : दहिगाव-ने -सर्वसाधारण महिला, बोधेगाव- अ.जा. महिला, लाड जळगाव- सर्वसाधारण, भातकुडगाव- अनुसूचित जमाती.

पाथर्डी तालुका : कासार पिंपगाव- सर्वसाधारण, भालगाव- सर्वसाधारण, माळी बाभुळगाव- ना.मा.प्र., मिरी -ना.मा.प्र., टाकळी मानूर- ना.मा.प्र. महिला.

नगर तालुका : देहरे- ना.मा.प्र., जेऊर- ना.मा.प्र. महिला, नागरदेवळे- सर्वसाधारण, दरेवाडी- ना.मा.प्र., निंबळक- सर्वसाधारण, वाळकी- सर्वसाधारण महिला.

राहुरी : टाकळीमियाँ - अ.जमाती महिला, ब्राह्मणी- अ.जमाती, सात्रळ- सर्वसाधारण, बारागाव नांदूर- ना.मा.प्र., वांबोरी- सर्वसाधारण.

पारनेर : ढवळपुरी- सर्वसाधारण, कान्हूरपठार- सर्वसाधारण, टाकळी ढोकेश्वर- ना.मा.प्र., निघोज- सर्वसाधारण, सुपा- सर्वसाधारण.

श्रीगोंदा : येळपणे- ना.मा.प्र. महिला, कोळगाव- सर्वसाधारण महिला, मांडवगण- सर्वसाधारण महिला, आढळगाव- सर्वसाधारण महिला, बेलवंडी- सर्वसाधारण महिला, काष्टी- सर्वसाधारण.

कर्जत : मिरजगाव- सर्वसाधारण, कारेगाव- ना.मा.प्र.महिला, कुळधरण- अ.जाती, राशीन- अ.जाती.

जामखेड : खर्डा- अ.जाती महिला, जवळा- अ.जाती.