शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याच्या पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:24 IST

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिलाचा पाठलाग करीत असताना बिबट्या थेट एका घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले पण बिबट्या घरात अडकला.

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शनिवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या पिलाचा पाठलाग करीत असताना बिबट्या थेट एका घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले पण बिबट्या घरात अडकला. दरम्यान वनविभागाच्या खास पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर घरातून बिबट्याला पिंज-यात जेरबंद केले. पिंपळगाव रोठा येथे दिलीप जगताप यांच्या घरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याच्या  पिलाचा पाठलाग करताना बिबट्या घरात घुसला. यावेळी जगताप यांच्या घरात त्यांचे कुटुंबीय घरातच होते. बिबट्याला पाहताच ते घाबरले. त्यांनी सर्वांनी धीर न सोडता सर्व जण दुस-या दरवाजातून बाहेर पडले. यानंतर बिबट्या ज्या दरवाज्यातून आला होता. तोही दरवाजा बंद केला. दोन्ही दरवाजे बंद करून घराला कड्या लावल्याने बिबट्या घरातच जेरबंद झाला. मोठ्या धाडसाने दिलीप जगताप यांनी आपल्या सर्व कुंटुबाला काही सेकंदात दुसºया दरवाजातून सुखरुप घराबाहेर काढल्याने नि:श्वास टाकला. या घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना कळाल्यानंतर सर्व तरुणांनी घराकडे धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने आमदार निलेश लंके यांना फोन केल्यानंतर काही तासात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घराच्या परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. जुन्नरच्या खास पथकाला पाचारणवनविभागाच्या कर्मचाºयांनी बिबट्याला पिंज-यात टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या. यानंतर कर्मचाºयांनी जुन्नर (जि.पुणे) येथील वनविभागाच्या खास पथकाला बोलविले. तब्बल चार तास उलटले तरी बिबट्या जेरबंद झाला नाही. शेवटी वनविभागाच्या पथकाने घराच्या खिडकीतून गनच्या साह्याने भूलीचे इंजेक्शन मारुन बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्यात यश मिळविले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरleopardबिबट्या