शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांबा ग्रामीण रुग्णालय : अधिका-यांविना चालतो रुग्णालयाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:58 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्तच आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.थोरात यांची ६ जूनला पुणतांबा बदली झाल्याने ते पद रिक्त आहे

मधु ओझापुणतांबा : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्तच आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.थोरात यांची ६ जूनला पुणतांबा बदली झाल्याने ते पद रिक्त आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे आहे.पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिक्षक एक पद, वैद्यकीय अधिकारी तीन पदे, अधिपरिचारिका एक पद, क्ष-किरण तंत्रज्ञ एक पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद, कक्ष सेवक एक पद, सफाई कर्मचारी दोन पदे, औषध निर्माण अधिकारी एक पद व सर्व कर्मचारी वर्ग व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा करणारे सुरक्षा रक्षक येथे नाही. रुग्णालयात येणाºया रुग्णाला तातडीची सेवा मिळत नाही. कारण निर्णय घेणारे वैद्यकीय अधीक्षक हे पद सहा वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजेचे दाखले, शव विच्छेदन, बाळंतपणातील गुंतागुंतीच्या केसेस कर्मचाºयांना अडचणीच्या ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प दंशाच्या रुग्णांना प्रथमोपचार देता येत नाही. कारण जबाबदारी घेणारे अधिकारी नाहीत. रात्री, अपरात्री तातडीचे उपचार रुग्णाला मिळत नाहीत. पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव, मातुलठाण, नाऊर, नायगाव तर राहाता तालुक्यातील जळगाव, रामपूरवाडी, नपावाडी, शिंगवे, पुणतांबा ही गावे येतात. तर वैजापूर तालुक्यातील लाखगंगा, बाबतरा, पुरणगाव, डोणगाव ह्या गावातील रुग्ण रोज असतात. सध्या प्रत्येक वारासाठी वेगळे वैद्यकीय अधिकारी असल्याने फेरतपासणीच्या रुग्णांना अडचणी येत आहे.या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.मी स्वत: एका शेतमजुराच्या मुलीला सर्पदंश झाला म्हणून पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात गेलो. उपचार देण्यासाठी कुणीच नसल्याने मुलीला अहमदनगरला घेऊन जायला निघालो. पण दुर्दैवाने त्या चिमुकलीने रस्त्यातच अखेरचा श्वास घेतल्याची घटना आयुष्यभर न विसरणारी आहे. - प्रभाकर धनवटे, नागरिक, पुणतांबा.वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी ही पदे उपसंचालकांकडून भरली जातात. त्याचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत. -डॉ.गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी, अहमदनगर.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर