शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 19:09 IST

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर टेकड्यांवरील धोकादायक दगड काढण्याचे काम सुरु आहे.

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर टेकड्यांवरील धोकादायक दगड काढण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना एक मोठा दगड थेट महामार्गाच्या मध्यावर आला. सुदैवाने यामुळे होणारा अपघात टळल्याची घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कुरकुंडी शिवारात घडली.कुरकुंडी परिसरात सुरु असलेल्या कामाच्या दरम्यान एक मोठा दगड अचानक रस्त्याच्या मध्यापर्यंत आल्याने, कामगारांची तारांबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी या ठिकाणी एखादे वाहन नसल्याने संभाव्य अपघात टळला. महामार्गाशी संबंधीत अनेक कामे ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने, या मार्गावर वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पठार भागातील चंदनापुरी घाट, कुरकुंडी परिसर व एकल घाटातील धोकादायक वळण या ठिकाणी उभा डोंगर तासून रस्ता बनविण्यात आला आहे. पावसाळ्यात या परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे महामार्ग व्यवस्थापनाने अनेक धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. तरीही काही ठिकाणी असलेले मोठे धोकेदायक दगड जेसीबीने फोडून काढण्याचे काम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु आहे. यासाठी रस्त्याच्यामध्ये बॅरिकेट टाकून एकेरी मार्गाचा वापर सुरु आहे.अनेक कामे प्रलंबितगेल्या महिन्यात या परिसरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, महामार्गाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तातडीने करण्याचे ठरले होते. बोटा, साकुर फाटा येथील सर्व्हिसरोड, दिशादर्शक फलक, गतीरोधक अशी कामे अद्यापही प्रलंबित आहेत. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर