शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भगिरी डोंगराला लागलेल्या आगीचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून जवळ असलेल्या गर्भगिरी डोंगरातील परशुराम दऱ्यात लागलेल्या आगीचा पंचनामा करून जबाब घेण्यात आले. घटनेचे ...

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून जवळ असलेल्या गर्भगिरी डोंगरातील परशुराम दऱ्यात लागलेल्या आगीचा पंचनामा करून जबाब घेण्यात आले. घटनेचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण शोधण्याचाही वनविभागाकडून शोध सुरू आहे.

पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडीजवळ (करंजी) असलेल्या गर्भगिरी डोंगररांगातील परशुराम दऱ्यात लागलेल्या आगीत झाडांचे झालेले नुकसान तसेच प्राणास मुकलेल्या पक्षी व प्राण्यांची पहाणी करून पंचनामे करण्यात आले. गर्भगिरी डोंगरावरच्या बाजूस बीड जिल्ह्याची हद्द येते. या पठार भागात आष्टी तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत.

आष्टी तालुक्यातील वनातून तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही आग काही वेळातच पाथर्डी तालुक्याच्या हद्दीत पोहोचली. रात्रीची वेळ व सुटलेल्या वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचण येत होती. गर्भगिरी डोंगराला लागलेली आग परिसरातील २०-२५ किलोमीटर अंतरावरून दिसत असल्याने परिसरातील अनेक नागरिकांनी घटनेची माहिती वन विभागास दिल्याने वनविभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक लोकांच्या सतर्कमुळे अनर्थ टळला. त्यामुळे या भागातील लाखो वृक्षही वाचले.

----

करंजीजवळील गर्भगिरी डोंगरास लागलेल्या आगीत ३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे तसेच जबाब नोंदविण्यात आले असून अहवाल नगर कार्यालयास पाठविला आहे.

-दादासाहेब वाघुलकर,

वन परिक्षेत्र अधिकारी, तिसगाव

----

तिसगाव वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी करंजीतील आगीच्या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली आहे. संबंधितांवर प्रतिबंधित कारवाई करून त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल.

-देवदत्त केकाण,

प्रांताधिकारी, पाथर्डी-शेवगाव