नेवासा : ‘डायव्हर्सिटी ऑफ हायपोमायसीट्स’ म्हणजेच ‘उपद्रवी बुरशीची वाढ थांबविणे’ अशा आशयाच्या ग्रंथाचे प्रकाशन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते नुकतेच झाले.
नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ. संजय घनवट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. या प्रकाशन सोहळ्यास बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, ॲड. के. एच. वाखुरे, सुधाकर पवार, सदाभाऊ जाधव, काकासाहेब गायके, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात लेखक डॉ. घनवट म्हणाले, उपद्रवी बुरशीची वाढ थांबवून मातीची सुपीकता वाढविणाऱ्या, पालापाचोळा कुजवून त्याचे खतामध्ये रूपांतर करणाऱ्या बुरशीविषयी माहिती देणारा हा ग्रंथ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
गडाख म्हणाले, वनस्पतीशास्त्र विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्ग संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरेल.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे, नीलेश पाटील, आसिफ पठाण, अण्णासाहेब पेचे, दत्तू शेटे, पी. आर. जाधव, भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब कोकणे, संभाजी पवार उपस्थित होते.
--
२० नेवासा१