शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांना गवसले हरवलेले मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST

अहमदनगर : समाजातील उच्चशिक्षण घेतलेल्या अनेक महिला कधी अत्याचाराच्या बळी ठरल्या, तर कोणाची अपेक्षापूर्ती न झाल्याने त्या मनोरुग्ण बनल्या. ...

अहमदनगर : समाजातील उच्चशिक्षण घेतलेल्या अनेक महिला कधी अत्याचाराच्या बळी ठरल्या, तर कोणाची अपेक्षापूर्ती न झाल्याने त्या मनोरुग्ण बनल्या. अशा अनेक महिलांना माउली सेवा प्रतिष्ठाणच्या मनगाव येथील प्रकल्पाने आश्रय दिला आहे. त्यांच्यासाठी डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे माउली बनून काम करीत आहेत. या दाम्पत्याच्या अखंड सेवाव्रतामुळे त्यातील अनेक महिलांचे हरवलेले मन गवसले आहे. अशा महिलांचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भुतकरवाडी येथील ओम सुप्रभात ग्रुपतर्फे रविवारी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

भुतकरवाडी येथील ओम सुप्रभात ग्रुपने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून रविवारी मनगाव प्रकल्पाला भेट दिली. यावेळी ओम सुप्रभात ग्रुपचे अनिल कटारिया, अविनाश जोशी, बबनरान सुंबे, रवींद्र शिंत्रे, अविनाश झिकरे, बाळासाहेब भगत, संजय मुद्गल आदी उपस्थित होते. सदस्यांतर्फे प्रकल्पासाठी किराणा साहित्य दिले. यावेळी डॉ. राजेंद्र धामणे यांचाही शाळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजात उपेक्षित ठरलेल्या, पीडित असलेल्या, गाव आणि मन हरवलेल्या महिलांना आधार देणारे डॉ. धामणे दाम्पत्य हे महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचेच आधुनिक जगातील सेवारूप आहे, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली. मनगाव प्रकल्पात तीनशेपेक्षा जास्त मनोरुग्ण महिला आहेत. डॉ. धामणे यांच्या अखंड सेवेमुळे अनेक महिलांना त्यांचे मन गवसले. अशाच उच्चशिक्षित

मात्र परिस्थितीने मनोरुग्ण बनलेल्या दोन महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. त्यातील एका ज्येष्ठ महिलेने

‘असावे आपले घरटे छान’ ही कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले.

यावेळी डॉ. धामणे म्हणाले, मनोरुग्णांना आधार देण्याचे काम हे सर्वसामान्य लोकांच्या मदतीमुळेच शक्य झाले आहे. मनोरुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. मनोरुग्णांना आश्रय देण्याचे काम ज्या दिवसापासून कमी होईल, त्याचवेळी समाजाची प्रगती झाली, असे म्हणता येईल. मनोरुग्ण असणे ही एक समस्या झाली. मनोरुग्णांमध्ये अनेक समस्या दडलेल्या आहेत. त्या समस्यांची आधी उकल करून त्या सोडविणे हेच खरे आव्हान आहे. त्या पेलण्याची ताकद समाजाकडूनच मिळते.

--

फोटो- ०३ मनगाव

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ओम सुप्रभात ग्रुपतर्फे मनगाव प्रकल्पातील दोन महिलांचा सत्कार करण्यात आला. समवेत डॉ. राजेंद्र धामणे, ओम सुप्रभात ग्रुपचे सदस्य, प्रकल्पातील केअर टेकर नीलम लोखंडे आदी.