शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोलेत  निषेध फेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 15:49 IST

अकोले- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्त्वाखाली अकोलेत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकरांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

अकोले- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्त्वाखाली अकोलेत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकरांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी आमदार लहामटे म्हणाले, शरद पवार हे बहुजन समाज्याचे नेते असुन त्यांच्यावर टीका करणारांची गय केली जाणार नाही. वैयक्तिक द्वेषापोटी शरद पवार यांचेवर टीका करणे योग्य नाही. टीका-टिप्पणी ही राजकीय मुद्द्यावर असेल तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, माञ पवार साहेब यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर केलेली टीका सहन केली जाणार नाही.

जाती-धर्मात सलोखा निर्माण करण्याचे काम ते करतात. पवार यांना मानणारा वर्ग प्रत्येक जाती धर्मात आहे. माञ धनगर जातीच्या मतावर डोळा ठेऊन भाजपाने आमदार म्हणुन त्यांना विधानसभेची आमदारकी दिली आहे. ज्यांना स्वत: विचारधारा नाही. त्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर बोलावे हा अतिशय निंदनिय प्रकार आहे. वंचितमध्ये असलेल्या पडळकर यांना अचानकपणे भाजपाने प्रवेश देऊन आपली प्रतिमा आणखी मलिन केली आहे.

त्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर फिरु देणार नाहीत. गोपिचंद पडळकर यांनी लवकर माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकपणे याचे उत्तर देतील. अमित भांगरे यांनीही पडळकर यांच्या बेताल व्यक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला.यावेळी अमित भांगरे, रवी मालुंजकर,अमित नाईकवाडी, स्वाती नाईकवाडी, सुभद्रा नाईकवाडी,  महेश तिकांडे, राजेंद्र कुमकर, सुरेश गडाख, संदिप भाऊसाहेब शेणकर, संतोष नाईकवाडी, अय्याज पठाण, आनंद देशमुख, दत्ता धुमाळ, राज वाकचौरे, निखिल नवले, अभिजित देशमुख, सचिन पवार  आदि उपस्थित होते