शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा खून खटल्यातील फितूर साक्षीदारांविरोधात सरकारी वकील जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 17:51 IST

राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात २६ पैकी महत्त्वाचे १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष सुटले. या फितूर साक्षीदारांविरोधात न्यायालयात अर्ज करणार असल्याचे फिर्यादीतर्फे खटला चालविणारे सरकारी वकील अ‍ॅड. आर. के. गवळी यांनी सांगितले.

ठळक मुद्देनितीन राजू आगे याची प्रेमप्रकरणातून २८ एप्रिल २०१४ रोजी दहा ते पंधरा जणांनी हत्या केली होती.नितीन याला तो शिक्षण घेत असलेल्या खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथून ओढत नेऊन त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला होता.या प्रकरणाचा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात १० जणांविरोधात २४ जुलै २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्याची २६ नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी सुरू झाली झाली. खटल्यात महत्त्वाचे असलेले १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व नऊ आरोपी निर्दोष सुटले. 

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात २६ पैकी महत्त्वाचे १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष सुटले. या फितूर साक्षीदारांविरोधात न्यायालयात अर्ज करणार असल्याचे फिर्यादीतर्फे खटला चालविणारे सरकारी वकील अ‍ॅड. आर. के. गवळी यांनी सांगितले.खर्डा येथे बारावीत शिक्षण घेत असलेला दलित समाजातील युवक नितीन राजू आगे याची प्रेमप्रकरणातून २८ एप्रिल २०१४ रोजी दहा ते पंधरा जणांनी हत्या केली होती. नितीन याला तो शिक्षण घेत असलेल्या खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथून ओढत नेऊन त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला होता. या घटनेनंतर मयत नितीन याचे वडील राजू नामदेव आगे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात १० जणांविरोधात २४ जुलै २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची २६ नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी सुरू झाली झाली. खटल्यात महत्त्वाचे असलेले १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व नऊ आरोपी निर्दोष सुटले. दहा पैकी एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला होता. या खटल्यात मयत नितीनचे आई-वडील, दोन बहिणी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, तपासी अधिकारी व विशेष न्यायदंडाधिकारी यांनीच साक्ष दिली होती. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हे साक्षीदार झाले फितूर

सदाशिव आश्रू होडशिळ (मयताच्या पंचनामा प्रसंगी उपस्थित पंच), विकास कचरू डाडर (घटनास्थळाचा पंच), रमेश भगवान काळे (नितीन आगेला मारहाण करताना आरोपीला पाहिले होते), रावसाहेब उर्फ बबलू अण्णा सुरवसे (नितीनला आरोपी मोटारसायकलवर घेऊन जाताना पाहिले होते), लखन अशोक नन्नवरे (घटनेची माहिती असलेला साक्षीदार), बाबासाहेब रमेश सोनवणे (आरोपीची मोटारसायकल जप्त केली त्यावेळचा पंच), अशोक विठ्ठल नन्नवरे (नितीन याला घेऊन जात असताना आरोपींना पाहिले होते), हनुमंत परमेश्वर मिसाळ (नितीन याचा वर्ग मित्र), राजू सुदाम जाधव.(आगे याला मारहाण करताना आरोपीला पाहिले होते, कोणत्या साक्षीदाराने काय पाहिले याचा दोषारोपपत्रात उल्लेख आहे.)

शिक्षकांनीही फिरविली साक्ष

खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आरोपींनी नितीन याला मारहाण करून मोटारसायकलवर बसवून रानात नेले होते. यावेळी शिक्षक बाळू ज्ञानेश्वर जोरे, साधना मारूती फडतारे, राजेंद्र बाजीराव गिते व परिचर विष्णू गोरख जोरे, संदीप मुरलीधर डाडर हे उपस्थित होते. पोलिसांनी या सर्व साक्षीदारांचे जबाब घेतले होते. न्यायालयात मात्र पोलिसांनी दमबाजी करून आमचे जबाब घेतले असे या साक्षीदारांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय