शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीबाबत वित्त विभागाला प्रस्ताव पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटीसंदर्भात ग्रामविकास विभागाकडून सकारात्मक प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात येणार आहे. याशिवाय समान ...

अहमदनगर : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटीसंदर्भात ग्रामविकास विभागाकडून सकारात्मक प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात येणार आहे. याशिवाय समान काम, समान वेतन, समान पदोन्नतीच्या टप्प्याबाबतही ग्रामविकास विभागाचा अभिप्राय समितीला पाठविण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उपसचिव जाधव, अवर सचिव माने यांच्यासह महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर, राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर, राज्य समन्वयक सागर बाबर, अहमदनगर कार्याध्यक्ष चेतन चव्हाण, अविनाश गावडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करणे व पुन्हा त्याच पदावर जाण्यासाठी पंधरा वर्षांची अट ३ वर्ष करणे, एकाकी पदाच्या एक किंवा दोन बदल्या करण्याची अट रद्द करणे, विभागीय आयुक्तांकडील खास बाब म्हणून बदल्या करण्यासंदर्भात तत्काळ आदेश निर्गमित करणे, संघटना पदाधिकार्‍यांना बदल्यांमध्ये सूट देणे, आदी विषयांबाबत चर्चा झाली. वरिष्ठ सहाय्यकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरणे, स्पर्धा परीक्षेची अट सातऐवजी तीन वर्ष करणे, स्पर्धा परीक्षा व सेवा प्रवेशोत्तर परीक्षा नियमितपणे घेणे, डीसीपीएसमधील कर्मचार्‍यांचे महागाई भत्ता फरक यावरील शासन हिस्सा देण्याबाबत सेवार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकांचे अडचणीसंदर्भात आरोग्य विभागाला कळविणे, शिक्षण विभागातील पदे वाढविणे यासंदर्भात चर्चा झाली. सर्व प्रश्नांवर राजेश कुमार यांनी सकारात्मक चर्चा केली व प्रशासनाला त्याप्रमाणे दुरुस्ती करण्याबाबत आदेश दिले. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीश दाभाडकर, मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष पंकज गुल्हाने आदींनी आनंद व्यक्त केला आहे.