राहुरी : येथील डॉ़ बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सहभागी तत्वावर देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासक दिगंबर हौसारे यांनी साखर उपसंचालक मिलिंद भालेराव यांच्याकडे पाठविला आहे़ डॉ़ विखे पाटील साखर कारखान्याचा एकमेव प्रस्ताव असून लवकरच चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार आहे़तनपुरे कारखाना सहभागी तत्वावर देण्यासाठी प्रशासकांनी निविदा प्रसिद्ध करुन प्रस्ताव मागविले होते, परंतु केवळ पाचजणांनीच प्रस्ताव दिले होते. यातील विखे कारखान्याचाच प्रस्ताव साखर उपसंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे़ अन्य प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे बाद झाले़ स्पर्धा नसल्याने कारखाना सहभागी तत्वावर चालविण्यास घेण्याबाबत काय चर्चा होते, याबाबत उत्सुकता आहे़तनपुरे कारखान्याकडे कामगार, शेतकरी व व्यापाऱ्यांची २६० कोटी रुपयांची देणी आहेत़ कारखान्याच्या संलग्न शैक्षणिक संस्था वगळता कारखाना सहभागी तत्त्वावर चालविण्यास देण्याचे नियोजन आहे़ ओव्हर आॅयलिंग, ऊसतोडणी मजूर व देणी लक्षात घेता, यंदा कारखाना सुरू होण्याची आशा मावळली आहे़ विखे कारखान्याने तनपुरे कारखाना चालविण्यास घेण्यास असर्थता दाखविल्यास जमीन विकून जिल्हा बँकेची देणी दिली जाणार आहेत़(तालुका प्रतिनिधी)
‘तनपुरे’ चा प्रस्ताव साखर उपसंचालकांकडे
By admin | Updated: September 20, 2015 00:49 IST