शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदारांच्या मालमत्ता जप्त

By admin | Updated: October 30, 2023 11:39 IST

अहमदनगर : नागरी पतसंस्थेच्या बड्या कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई अवसायक मंडळाने सुरु केली

अहमदनगर : अवसायनात निघालेल्या संपदा नागरी पतसंस्थेच्या बड्या कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची कारवाई अवसायक मंडळाने सुरु केली असून, याबाबत अवसायक मंडळाने गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली़ संपदाच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात अशी सूचना हजारे यांनी यावेळी केली़अवसायक मंडळाचे प्रमुख व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, वसंत लोढा, सुरेश म्हस्के, चंद्रभान खुळे यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची गुरुवारी भेट घेतली़ संपदा पतसंस्थेच्या पारनेर तालुक्यातील बड्या कर्जदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्याचे अवसायक मंडळाने हजारे यांना सांगितले़ वसुली पथकाने कर्जदारांच्या जंगम मालमत्तेचा पंचानामा करुन पारनेर, सुपा, पवारवाडी येथील चार बड्या कर्जदारांवर जप्तीची कारवाई अवसायक मंडळाने केली आहे़ यामध्ये संपत पवार यांच्या हॉटेल लोकसेवाला अवसायक मंडळाने सील ठोकले़ तर मयत कर्जदार संतराम तामखेडे यांचे वारस सचिन तामखेडे यांची जंगम मालमत्ता, सुनीता दिलीप औटी यांचे सेतू कार्यालय, अरुण पवार व आनंदा पवार यांची जंगम मालमत्ता सील केल्याचे अवसायकांनी हजारे यांना सांगितले़ तसेच थकीत कर्जदारांच्या घरी जाऊन कर्जाची रक्कम तात्काळ भरण्याची समज वसुली पथकाने दिली़ काही कर्जदारांनी थकीत कर्ज फेडण्याचे आश्वासन अवसायक मंडळाला दिले आहे़ त्यामुळे संपदा पतसंस्थेतील ठेवीदारांना लवकरच ठेवी परत मिळतील, असे वसंत लोढा यांनी सांगितले़ कारवाईत वसुली अधिकारी अ‍ॅड़ सुशांत वाडिले, संजीव हंबारे, बाळासाहेब नवघरे यांनी सहभाग घेतला़ हॉटेल लोकसेवाचे सील तोडल्याप्रकरणी अवसायक मंडळाने हॉटेल मालकाविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे अवसायक मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)