शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

महानायकाची स्वप्नवत भेट अनुभवणारा प्राध्यापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:05 IST

बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. चुलत्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ओटीत मुलगा टाकला. सिंधुताईंच्या मार्गदर्शनाने हाच मुलगा पुढे प्राध्यापक झाला. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावरही पोहोचला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जवळपास सात मिनिटे संवाद साधला.

गणेश आहेर। लोणी : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. चुलत्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ओटीत मुलगा टाकला. सिंधुताईंच्या मार्गदर्शनाने हाच मुलगा पुढे प्राध्यापक झाला. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावरही पोहोचला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जवळपास सात मिनिटे संवाद साधला. या व्यक्तिमत्त्वाचे नाव उत्तम ओंकारजी येवले होय.  ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुताई यांनी घडविलेल्या हजारो मुलांपैकी दहा निवडक मुलांना कार्यक्रमात सहकुटुंब निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आश्चर्यकारकपणे मूळचे शहापूर (ता.चिखलदरा,ता.अमरावती) येथील आणि सध्या लोणी खुर्द (ता.राहाता) येथे वास्तव्यास असलेल्या प्रा.येवले, पत्नी सुनंदा, मुली गायत्री व दीपाली यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सिंधुताई यांच्याबद्दल आठवणी प्रा.येवले यांच्याकडून वदवून घेतले. सात मिनिटे प्रा.येवले यांच्याशी बच्चन यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. या संवादाच्या दरम्यान महाराष्ट्रीयन असूनही स्वच्छ हिंदी भाषा बोलल्याबद्दल बिग बीं कडून कौतुकाची थाप मिळाली. येवले यांच्यासाठी हे सारं स्वप्नवतच होते. येवले लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात हिदीं विषयाचे प्राध्यापक आहेत.  आई -वडील डोळे उघडायच्या आतच गेले.  सिंधुताई अर्थात माझी माईच माझं सर्वस्व आहे. माईमुळेच महानायकाला पाहण्याचा, भेटण्याचा अन बोलण्याचा योग आला. माझ्यासाठी हे सारे काही स्वप्नंवतच होते, असे प्रा. उत्तम येवले यांनी सांतिगले.     पतीमुळे मला महानायकाला भेटण्याचा योग आला. महानायकातील महामाणूस मी अनुभवला. आमच्या दोन मुली आमच्याशिवाय राहू शकत नाही हे जेव्हा महानायकाला समजले तर त्यांनी मुलींनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, असे सुनंदा येवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनAhmednagarअहमदनगर