शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर, कुकडी १३२ जोड कालव्याखालील पाणी वाटपाचे खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : राज्य शासनाने राज्यातील छोटे तलाव, कालव्यांच्या पाणी वाटपाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात कुकडी प्रकल्पातील ...

श्रीगोंदा : राज्य शासनाने राज्यातील छोटे तलाव, कालव्यांच्या पाणी वाटपाच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात कुकडी प्रकल्पातील विसापूर तलाव व कुकडी किमी १३२ कालव्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच या कालव्याखालील पाणी वाटप खासगी पद्धतीने सुरू होणार आहे .

विसापूर कालव्यातून निंबवी, विसापूर, पिंपळगाव पिसा, खरातवाडी, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, घारगाव, पिसोरे, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी गावातील आठ हजार हेक्टर क्षेत्र असून २७ सहकारी वाटप संस्था आहेत. कुकडी किमी १३२ कालव्याखाली घारगाव, लोणी व्यंकनाथ, पारगाव, श्रीगोंदा, वेळू, लिंपणगाव, म्हातारपिंप्री, मढेवडगाव, शिरसगाव बोडखा या गावातील सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या परिसरात २९ सहकारी पाणी वापर संस्था आहेत.

कुकडी अंतर्गत उप अभियंता पदापासून मजूर पदापर्यंतची ८० पदे रिक्त आहेत. सेवकांच्या वेतन प्रमाणात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी मिळत नाही. त्यामुळे नोकर भरती न करता पाणी वाटपाचे खासगीकरण करून सहकारी संस्था मार्फत पूर्वीप्रमाणे ते पाणी शेतकऱ्यांना देण्याची खासगीकरण प्रकिया सुरू झाली. मात्र खासगीकरणाच्या या प्रकियेत काही दिवसानंतर सहकारी पाणी वापर संस्था बंद शेतकरी खासगी एजन्सी विळख्यात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विसापूर हा कुकडी प्रकल्पातील साठवण तलाव आहे. या तलावाचा कुकडी प्रकल्पात समाविष्ट करण्याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका न घेता विसापूर तलावातील जलसाठ्याचे खाजगीकरण केले आहे .

यापुढे सहकारी पाणी वापर संस्था या खासगी एजन्सीच्या अंतर्गत येणार आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांना पाणीपट्टीचा महसूल नियमितपणे खासगी एजन्सीला द्यावा लागणार आहे.

----

पाणी वापर संस्था, शेतकऱ्यांशी चर्चाच नाही..

विसापूर, कुकडीच्या १३२ जोड कालव्याची निविदा प्रकिया सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने शेतकरी, सहकारी पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक घेऊन कल्पना देणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे औत्सुक्याचे दिसते.