शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी दूध धंद्याला चाप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:50 IST

ग्रामीण भागातील खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावून सहकारी दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणार असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे सांगितले.

ठळक मुद्देमहादेव जानकर ३० रूपये भाव वाढीचे आश्वासन
ब्राह्मणवाडा : ग्रामीण भागातील खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावून सहकारी दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणार असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ब्राह्मणवाडा (ता. अकोले) येथे सांगितले. खाजगी भेटीसाठी ते येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’ ही माहिती दिली. येथील श्रीकृष्ण दूध उत्पादक संस्था,दूध शीतकरण केंद्र व ग्रामपंचायतीस भेट देऊन माहिती घेतली. एका छोट्याशा खेडेगावातील अडीच हजार लिटर दूध संकलन व शीतकरण केंद्र पाहून ते थक्क झाले. यावेळी त्यांनी परिसरातील दूध उत्पादक व ग्रामस्थांशी चर्चा केली. येथील श्रीकृष्ण दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक संचालक गोकूळ आरोटे यांनी गाईच्या दुधास किमान तीस रुपये भाव करण्याची मागणी केली. मंत्री जानकर यांनी भविष्यात ३.५ व ८.५ गुणप्रतिच्या दुधास तीस रुपये भाव वाढ करण्याचे आश्वासन दिले. हे सरकार दूध उत्पादक शेतकºयांना दिलासा देईल तसेच त्यांच्या पाठीमागे उभे राहील, असे सांगून ब्राह्मणवाडा गावचा परिसर,प्रतिकूल परिस्थितीवर कष्ट आणि मेहनतीने मात करणाºया येथील शेतकºयांचे जानकर यांनी कौतुक केले. गोकूळ आरोटे,माजी सरपंच एल.बी.आरोटे ,धोंडीभाऊ चव्हाण,रवींद्र हांडे,शंकर हांडे,उपसरपंच भारत आरोटे व सदस्यांनी जानकर यांचा सत्कार केला.