शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

वाहतूक, नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST

जामखेड : शहरातील वाहतूक, पार्किंग, नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षाविषयक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी ...

जामखेड : शहरातील वाहतूक, पार्किंग, नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षाविषयक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

जामखेड शहरात व्यापारी, नागरिक, पाेलीस प्रशासन यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते. पोलीस प्रशासनाकडून नागरिक, व्यापारी यांना काय अपेक्षित हे त्यांनी जाणून घेतले. तालुक्याचा विस्तार आणि शहराची लोकसंख्या पाहता पोलीस बळ अत्यल्प आहे. त्यासाठी जोपर्यंत व्यापारी, नागरिक पुढे होऊन पोलीस प्रशासनाला मदत करत नाहीत तोपर्यंत ठोस पावले उचलता येत नाहीत. यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही बसवावेत. आपापल्या भागात, पेठेत, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन रात्री रखवालदार ठेवणे, पार्किंगच्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अगोदर पार्किंगची पर्यायी व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही अद्याप दुकानदारास मुद्देमाल मिळाला नाही. मेन रोडवरील अतिक्रमण पाहता निम्म्याहून कमी रस्ता वापरात आहे. तसेच बीड रोड कॉर्नरसारख्या ठिकाणांवर बरेच टवाळखोर मुले, रस्त्याला अडथळा करत मोटारसायकल आडवी लावून उभी असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी कोठारी यांनी केली.

मंगेश आजबे म्हणाले, शेतकऱ्यांवर बऱ्याच वेळेस अन्याय होत आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. शहानिशा करूनच ट्रीपल सीट दुचकीस्वारांवर कारवाई करावी. कृष्णा आहुजा, सुनील जगताप, संतोष नवलाखा, विकी घायतडक, अमित चिंतामणी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, नगर परिषदेचे अधिकारी शेळके, पवन राळेभात, कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय कटारिया, मोबाइल असोसिएशनचे सुनील जगताप, उमेश नगरे, ऋषिकेश चिंतामणी, अमोल तातेड, विकी सदाफुले, अमोल लोहकरे, विशाल अब्दुले, सोमनाथ पोकळे, आनंद गुगळे, अनुराग गुगळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, मनोज भंडारी, विजय अहुजा, तुषार बोरा, हरिश्‍चंद्र राळेभात, शिवकुमार डोंगरे, सलीम सय्यद, अरविंद पारख, महादेव गव्हाणे, प्रशांत हिरवे, बजरंग सरडे, अजय अवसरे, अविनाश ढेरे आदी उपस्थित होते.