अहमदनगर : शहराच्या सुधारित पाणी पुरवठा (फेज टू)योजनेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर राहील. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला नगरसेवकांसोबत प्रभागातील अडचणींबाबत आढावा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही महापौर सुरेखा कदम यांनी दिली.पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या योजना नगरकरांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. ‘सर्वांसाठी घर’ योजना प्रभावीपणे राबविली जाईल. उपनगरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासावर भर राहील. नगर शहरही स्मार्ट सिटी होण्यासाठी प्रयत्न करू. शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देऊन आठशे अश्वशक्तीचा पंप लवकरात लवकर बसविण्यासाठी नियोजन करू. शहरातील सर्व प्रमुख चौकांचे सुशोभिकरण करण्यात येईल. राज्यात व केंद्रात युतीची सत्ता असल्याने शहराला भरीव निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. (प्रतिनिधी)
फेज टूू योजनेला प्राधान्य
By admin | Updated: July 7, 2016 23:25 IST