शिर्डी : अहमदनगर लोकसभा युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर येथे होणा-या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. येथून पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमधून अहमदनगरमध्ये दाखल होणार आहेत.शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता अभय शेळके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, शहराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, संस्थानचे विश्वस्त बिपिनराव कोल्हे, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हेलिकॉप्टरद्वारे नगरला पोहोचणार आहेत. आर्मड स्कूल अॅण्ड सेंटर येथील हेलिपॅडवर उतरून ते चारचाकी वाहनातून सभेस्थळी पोहोचणार आहेत. ठीक ११ वाजता त्यांची सभा सुरु होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 10:28 IST