शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाला हात लावल्यास किंमत चुकवावी लागेल

By admin | Updated: April 22, 2016 00:13 IST

शिर्डी : सरकार दलितांचे आरक्षण काढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेस राजकारण करत भाजपाला या मुद्द्यावर बदनाम करीत असल्याचा आरोप आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला़

शिर्डी : पंतप्रधान मोदी यांनी सरकार दलितांचे आरक्षण काढणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेस राजकारण करत भाजपाला या मुद्द्यावर बदनाम करीत असल्याचा आरोप आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला़ पंतप्रधान मोदींनी भाजपा,संघाच्या विचारसरणीनुसार आमच्या आरक्षणाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला़समाजातील तेढ संपवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भारत भीम यात्रेच्या निमित्ताने शिर्डीत आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी तानसेन ननवरे,श्रीकांत भालेराव,बाबुराव कदम,अशोक गायकवाड,दीपक गायकवाड, आत्माराम वाघमारे, डॉ़राजेंद्र पिपाडा, राजू विघे, सुभाष त्रिभुवन,आबा ननवरे, राजेंद्र मगर, कैलास शेजवळ, रमेश गायकवाड, चांगदेव जगताप आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़मुंबई महापालिका निवडणुकीत अशक्य वाटत असले तरी सेना-भाजपाला एकत्र आणून त्यांच्यासह निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे़ मात्र तसे झाले नाहीतर जो आमच्या बरोबर येईल त्याच्यासह लढू असे आठवले यांनी सांगितले़ काँग्रेस पक्ष जातीयवादी नसला तरी त्यातील काही नेते जातीयवादी आहेत़ त्यामुळेच आपल्या विषयी अपप्रचार करून शिर्डीत आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप आठवलेंनी केला़ आमच्या मदतीमुळे भाजप सत्तेत आहे. आम्ही त्यांचे मित्र आहोत, गुलाम नाही. सत्तेत वाटा देण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पाच वर्षे पूर्ण झाल्यावर सत्तेत वाटा देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण द्यावे, संस्थान विश्वस्त मंडळ तातडीने नियुक्त करावे, तातडीने चारा छावण्या सुरू करण्याबाबत किंवा घरपोच चारा देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली़ मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा अशी सरकारचीही भूमिका असून यात काँग्रेस राजकारणासाठी आंदोलनाला छुपी मदत करत असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली़शंकराचार्यांची साईबाबांविषयीची वक्तव्ये गैर असल्याचे मतही आठवलेंनी व्यक्त केले़ दलित चळवळीतील युवा नेते चांगदेव जगताप यांनी खासदार आठवले यांच्या उपस्थितीत यावेळी आरपीआय मध्ये प्रवेश केला. जगताप यांच्यावर उत्तर नगर जिल्हा युवक आरपीआय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे़(तालुका प्रतिनिधी)