नामदेव दादाभाऊ बोडके (वय ६०, रा. म्हसवंडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बोडके हे दुचाकीहून जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आली.
‘मी पोलीस आहे, चेकिंग चालू आहे.’ असे तो अनोळखी व्यक्ती बोडके यांना म्हणाला. त्यानंतर बोडके यांच्या गळ्यातील चेन, हातातील घड्याळ त्याने काढायला सांगितले. या वस्तू एका रुमालात ठेवून तो रुमाल बोडके यांच्या दुचाकीच्या डिक्कीत त्याने ठेवल्याचे भासविले. त्यानंतर पोलीस अशी ओळख सांगणारी अनोळखी व्यक्ती तेथून निघून गेली. काही वेळाने बोडके यांनी डिक्की खोलून रुमाल उघडून पाहिला असता त्यात सोन्याची चेन व घड्याळ नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठत घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉस्टेबल के. एम. देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.