शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या राजश्री घुले होणार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:02 IST

राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजप या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी असल्याने घुले-शेळके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही एकत्र दिसणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले या अध्यक्ष, तर काँग्रेसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजप या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी असल्याने घुले-शेळके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. यावेळी आमदार रोहित पवार, आशुतोष काळे, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार नरेंद्र घुले, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सत्यजित तांबे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री घुले आणि उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रताप शेळके यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर घुले, शेळके यांनी पिठासन अधिकारी उर्मिला पाटील, वैशाली आव्हाड, वासुदेव सोळंके यांच्याकडे अर्ज दाखल केला. माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयात माजी पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे, शालिनी विखे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी ठरविण्यावर चर्चा झाली. यातजिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनीता खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. 12 वाजून 45 मिनिटांनी भाजपकडून खेडकर व आठरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.