शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरचे कलावंत करणार न्यूझीलंडमध्ये लावणीचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 18:58 IST

लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम आता न्यूझीलंडमध्ये घुमणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील राजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राचे ११ कलावंत न्यूझीलंडमध्ये १२ आॅक्टोबरपासून लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

ठळक मुद्देराजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राच्या ११ कलावंताचा समावेशकेंद्र शासनाच्या आयसीसीआर विभागाकडून निवड न्यूझीलंडमध्ये १२ आॅक्टोबरपासून लावणी दर्शन हा कार्यक्रम १७ दिवसांसाठी या केंद्राची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम आता न्यूझीलंडमध्ये घुमणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील राजश्री व आरती काळे यांच्या कालिका केंद्राचे ११ कलावंत न्यूझीलंडमध्ये १२ आॅक्टोबरपासून लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर करणार आहेत. केंद्र शासनाच्या आयसीसीआर विभागाकडून महाराष्ट्राच्या  पारंपारिक लावणीचा कार्यक्रम परदेशात सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

राज्यासह देशभरात अहमदनगरच्या लावणी सम्राज्ञी -अभिनेत्री राजश्री आणि आरती काळे यांच्या लावणीला सवार्नीच दाद दिली आहे. आतापर्यत परदेशासह देशतील विविध ठिकाणी त्यांनी लावणीचे कार्यक्रम सादर केले आहेत. याच माध्यमातून त्यांची न्यूझीलंड दौ-यासाठी निवड झाली आहे. राजश्री आणि आरती यांच्यासह ११ कलावंत न्यूझीलंडच्या दोन शहरात  लावणी सादर करणार आहेत. तसेच तेथील कलाकारांना लावणीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या दौ-यामध्ये पारंपारिक गण, गौळण, मुजरा, नृत्य, अदाकारीची लावणी, बैठकीचा लावणी, श्रृगांरिक लावणी, छक्कड आणि खंडोबाचे जागरण गीत असा दोन तासांचा लावणी दर्शन हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. 

या दौ-यासाठी  राजश्री व आरती या भगिनींसह ढोलकीवादक पांडुरंग घोटकर, कृष्णा मुसळे, हार्मोनियमवादक सुधीर जावळकर, गायिका स्मिता बने, निवेदन नरेंद्र बेडेकर यांच्यासह आरती जावळे, शीतल काळे, रागिणी काळे, राणी काळे यांचा समावेश आहे. यंदाच्या दौ-यापुर्र्वी कालिका कलाकेंद्राच्या टीमने तीन देशांचा दौरा केला आहे. २०१० मध्ये १७ दिवसांसाठी या केंद्राची निवड झाली होती. २०१० मध्ये जपान, रशिया आणि इंडोनेशिया येथे लावणी सादर करण्यात आली. त्यानंतर सात वर्र्षांनी न्यूझीलंड दौ-यासाठी या केंद्राची निवड झाली आहे. 

मराठी मातीतील गोडवा आणि सोज्वळतेमुळे परदेशात लावणी प्रसिध्द होत आहे. सरकारने केलेल्या निवडीमुळे आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंड दौ-यामुळे आणखी प्रगल्भता नक्कीच मिळणार आहे. लावणीला मिळणा-या या व्यासपीठामुळे भविष्यात उत्तमोत्तम कलाकार पाहायला मिळतील. अभिनयाला भाषेची गरज नसल्याने हावभाव, नृत्यमुद्रा रसिकांपर्यत पोहोचवण्याची ताकद लावणीमध्ये आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्येसुध्दी लावणी गाजेल असा विश्वास आहे. - राजश्री व आरती काळे, संचालक, कालिका कला केंद्र, सुपा(अहमदनगर)