शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत पोलीस स्टेशनच्या आवारात व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:44 IST

ताहराबाद येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर विधाटे यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. 

राहुरी : ताहराबाद येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर विधाटे यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी यासंदर्भात जिओच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविले असून भरपाई संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.गंगाधर विधाटे हे रॉकेलची बाटली व काडीपेटी घेऊन बुधवारी दुपारी राहुरी पोलीस स्टेशनच्या आवारात आले. तहसील व पोलीस खात्याला निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याचा आरोप करीत अंगावर रॉकेल टाकले़ काडी पेटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच समोर असलेल्या पोलिसांनी त्याला रोखले़ विधाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.‘लोकमत’शी बोलतांना विधाटे यांनी सांगितले की, ताहाराबाद येथे माझे हॉटेल व घर आहे. शेतातून जिओ कंपनीची लाईन गेली आहे. पोकलँडच्या सहाय्याने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हॉटेल व घराला तडे जाऊन नुकसान झाले आहे. जिओ कंपनीने नुकसान भरपाई द्यावी म्हणून कंपनीकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे टाळले. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र मला न्याय मिळाला नाही़ त्यामुळे मी पोलीस स्टेशनच्या आवारात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला़ जिओ कंपनीने माझे झालेले नुकसान द्यावे, असे त्यांनी सांगितले.गंगाधर विधाटे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे. पंचनामा करण्यात आला असून जिओ या खासगी कंपनीच्या अधिका-यांना भरपाई देण्यासंदर्भात सांगितले आहे. जिओ कंपनीच्या अधिका-यांची बैठक बोलविली आहे. कंपनीचे अधिकारी दप्तर घेऊन येणार असून कंपनी जबाबदार असून त्यांनी भरपाई द्यायची आहे. -अनिल दौंडे, तहसीलदार, राहुरी 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी