शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बहुआयामी व्यक्तीमत्वाची अकाली एक्झीट; अनेक गावे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:04 IST

अहमदनगर : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध़ साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि ...

अहमदनगर : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध़ साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत चौफेर अभ्यास असलेले असे हे व्यक्तीमत्व़ कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची हातोटी आणि लोकांना आपलेसे करुन घेण्याची कला असलेल्या राजीव राजळे यांची अकाली एक्झीट अहमदनगरकरांना एक मोठा धक्का देऊन गेली़पुणे विद्यापीठातून आर्किटेक्चर पदवी मिळविल्यानंतर राजीव राजळे यांनी १९९९ मध्ये राजकारणात प्रवेश केला़ प्रारंभी तरुणांचे प्रश्न घेऊन ते व्यवस्थेशी भांडू लागले़ त्यांचे प्रश्न सोडवू लागले़ त्यानंतर काँगे्रसने राजीव राजळे यांना युथ काँगे्रसची जबाबदारी सोपविली़ त्यानंतर त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे करीत तालुक्यावर पकड मिळविली़ त्याचवेळी त्यांनी विविध विषयांचा व्यासंग वाढविला़ कोणत्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण मत मांडत़ पाथर्डीसारख्या ग्रामीण भागात राजीव राजळे यांनी साहित्यिकांचा मेळा भरविला़ ग्रंथालय चळवळ सुरु करण्यासाठी पुस्तकभेट हा पहिला उपक्रमही राजीव राजळे यांनीच राबविला़ कविसंमेलनापासून संगीत रजनी असे विविध कार्यक्रम आयोजित करुन सांस्कृतिक क्षेत्राचा पाया भक्कम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ ते अनेक विचारवंत, साहित्य यांना त्यांच्या घरी बोलावून विविध विषयावर, नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर, ग्रंथांवर चर्चा करीत़ एक तरुण राजकारणी आणि साहित्यप्रेमी अशी त्यांची ओळख होत असतानाच त्यांनी अर्थशास्त्रावरही पकड निर्माण केली होती़ आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अवकाश तंत्रज्ञान यामध्येही त्यांची विशेष रुची होती़ आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल माहिती ते ठेवायचे़ वाचनाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता़ दलाई लामांपासून ते बांगलादेशच्या बचत गटाच्या प्रवर्तकांपर्यंत तसेच थोर साहित्यकांपासून सामान्यांपर्यंत अतिशय स्नेहपूर्ण सबंध जपणारा युवा नेता अशी त्यांची ओळख होती़ अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाची अकाली एक्झीट नगर जिल्ह्यात सर्वांनाच चटका लावून गेली़ त्यांच्या अकाली निधनामुळे पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये उत्स्फूर्त बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली़ विविध संस्था, व्यापारी, दुकानदार यांनी आपले दैनंदिन कामकाज बंद ठेवून उदोग धंदे बंद ठेवले आहेत.