ग्रामीण भागातील प्रत्येक गावात १० ते १५ दिव्यांग संख्या असेल, परंतु त्यांना सुद्धा लस मिळत नाही. खरे तर दिव्यांगांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे प्रथम त्यांचा विचार होणे गरजेचे असताना तालुक्यातील पुढारी किंवा इतर ओळखीचे लोक वशिला लावून आपल्या मर्जीतील लोकांना लस देत आहेत. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत असणारा दिव्यांग तसाच बसून राहतो. नंतर दुपारी एक वाजता लस संपल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनाने पुढील आठवड्यात प्रत्येक गावातील आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करुन देण्यात यावी व ‘फ्रंट लाईन’ च्या प्राधान्याने दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करावे. अन्यथा नगर तहसीलदार दालनासमोर कोणतीही पूर्व कल्पना न देता सर्व दिव्यांग उपोषण करतील, असा इशारा रुद्र अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. वसंत शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल सोनवणे, महेश विभूते, जिल्हा सरचिटणीस अमोल कराळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कैलास शेलार, जिल्हा संघटक बेबीताई देवकर, नगर तालुकाध्यक्ष रामजी तुपे, उपाध्यक्ष श्रीकांत काळे आदींनी दिला आहे.
ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST