शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतच्या लाडक्या लेकीची हेलिकॉप्टरमधून बिदाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:17 IST

हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय कर्जतकरांना रविवारी आला. विवाहानंतर पित्याने लाडक्या लेकीला निरोप देताना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविले. ही बिदाई कर्जतकरांनी डोळे भरून पाहिली.

कर्जत : हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय कर्जतकरांना रविवारी आला. विवाहानंतर पित्याने लाडक्या लेकीला निरोप देताना चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी पाठविले. ही बिदाई कर्जतकरांनी डोळे भरून पाहिली.कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तारेक सय्यद यांची कन्या मिसबा हिचा विवाह बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील मोहंमद अयाज यांच्याशी रविवारी झाला. नवरी मुलीला सासरी पाठविण्यासाठी चार चाकी गाडी सजवून वाजत गाजत निरोप दिला जातो. मात्र कर्जतकरांनी रविवारी वेगळाच अनुभव घेतला. वधू पिता तारेक सय्यद यांनी आपल्या लाडक्या लेकीला थेट हेलिकॉॅप्टरमधून निरोप दिला. पुणे येथून मागविण्यात आलेले हे खासगी हेलिकॉप्टर कर्जतकरांचे आकर्षण ठरले. या विवाह समारंभाला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचीही उपस्थिती होती.दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानावर या नवदांपत्यास कर्जतकरांनी निरोप दिला. यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, सामाजिक कार्यकर्त्या भामाबाई राऊत, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, माजी सरपंच संतोष म्हेत्रे, कर्जत मेट्रोचे अध्यक्ष राहुल सोनमाळी, रज्जाक झारेकरी, अफसार सय्यद, अफताब सय्यद व मान्यवर उपस्थित होते.

समाजात मुलींविषयी चुकीचा गैरसमज निर्माण झाला आहे. अनेकांना मुली नकोशा वाटत आहेत, हे चुकीचे आहे. समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे. आई, वडिलांच्या दृष्टीने मुलगी व मुलगा हे समानच असावेत, हा संदेश जाण्यासाठी मुलीची हौस केली.-तारेक सय्यद, वधू पिता

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत