शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा

By चंद्रकांत शेळके | Updated: June 5, 2023 19:47 IST

प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर: शेतकरी वर्गाला दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, तसेच जे रोहित्र नादुरुस्त होतात, ते ४८ तासांत बदलून देण्यात यावेत, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, विजय भंडारे, सुरेशराव लांबे, ऋषिकेश इरुळे, लक्ष्मीताई देशमुख, दादासाहेब काकडे, जयसिंग उगले, रामजी शिदोरे, सुदाम निकत, सुरेश सुपेकर, भगवान भोगाडे, सुरेशराव लांबे, मुकुंदराव आंधळे, रावसाहेब भोर, नानासाहेब पारधे, गोरक्ष पालवे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. असे असताना त्यांना वेळेवर वीज न मिळाल्याने पाणी असूनही त्यांची पिके वाया जातात. रात्री वीज असेल तर जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज गरजेची आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या आहेत. आंबीलवाडी फाटा, वंदे मळा येथील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार असून शेतामध्ये खांब वाकले आहेत. अनेक रोहित्रांची केबल जळालेली असून ते पावसाळ्याआधी बदलून मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन पूर्वीच देण्यात आले होते. परंतु दखल न घेतल्याने प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. महावितरणचे आश्वासनयाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे होण्याबाबत लेखी आश्वासन दिले. निंबोडी गावठाण येथे नवीन रोहित्र तातडीने मंजूर करण्यात आले आहे. रोहित्राची केबल, वाकलेले खांब, तारांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करू. ठेकेदारांबरोबर तशा बैठका घेऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण