शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधीक्षकपदावरुन दोन मंत्र्यांची ताकद पणाला

By admin | Updated: March 17, 2016 23:43 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सध्याचे कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारण्याचे दिलेले आदेश गुंडाळून दुसऱ्या मंत्र्यांनी आपल्याच माणसाला खुर्चीवर बसविल्याची चर्चा कृषी विभागात खुलेआम सुरु आहे़तत्कालीन कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अकोला येथील रमेश गोसावी यांना पदोन्नती देण्यात आली़ मात्र, गोसावी हजर होताच त्यांना दमबाजी करुन रजेवर पाठविण्यात आले़ त्यांनी प्रारंभी १४ दिवसांची रजा घेतली होती़ मात्र, ते अद्याप रुजू झाले नाहीत़ त्यांच्या रिक्त जागेवर आत्माचे संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे हे यांची नियुक्ती झाली. मात्र, बऱ्हाटे यांना कोणताही आदेश नसताना ते या खुर्चीत बसून कारभार हाकीत आहेत़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार कृषी आयुक्तांनी कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर नियुक्ती दिली़ मात्र, बऱ्हाटे हे गायकवाड यांच्याकडे पदभार देत नाहीत़ बऱ्हाटे यांना दुसऱ्या मंत्र्यांचा पाठिंबा आहे़ त्यामुळे बऱ्हाटे खुर्ची सोडत नाहीत, अशी चर्चा कृषी विभागात रंगली आहे़गोसावींना धमकी कोणी दिलीरजेवर गेलेले कृषी अधीक्षक गोसावी हे कृषीमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात़ माने यांच्या बदलीनंतर गोसावींना नगरला नियुक्ती दिली़ मात्र, गोसावी यांनी पदभार स्वीकारताच त्यांना दुसऱ्या मंत्र्याने दम भरला़ म्हणून ते रजेवर गेल्याची चर्चा कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आहे़ ही चर्चा चोरीछुपके नाही, हे विशेष!जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश भाऊसाहेब बऱ्हाटे यांना लेखी स्वरुपात दिले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे़ याबाबत बऱ्हाटे यांना विचारले असता ते म्हणाले, कृषी आयुक्तांनी मला पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत़ हे आदेश दोघांनाही आहेत का असे विचारले असता बऱ्हाटे हो म्हणाले़कृषी कार्यालयात तोडफोडबुधवारी दुपारी तीन वाजता एका कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याची घटना घडली़ या घटनेलाही दोघा अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची झालर असल्याचे बोलले जात आहे़ बऱ्हाटे यांनी पदभार न सोडल्यास कृषी विभागात आता दंडुके घेऊन यावे लागेल, अशी परिस्थिती ओढावल्याचे कर्मचारी बोलत आहेत़