शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

श्रीगोंद्यातील शक्तिस्थाने गर्दीने फुलली

By admin | Updated: October 7, 2016 00:54 IST

श्रीगोंदा : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनी गावे भक्तिमय झाली आहेत.

श्रीगोंदा : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनी गावे भक्तिमय झाली आहेत. श्रीगोंदा येथील साळवणदेवी, कोळगावची कोळाई देवी, पिंपळगाव पिसा येथील रेणुकामाता, रायगव्हाण व थिटे सांगवी येथील पद्मावती देवींची देवालये प्रसिद्ध आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. श्रीगोंदा येथील साळवणदेवीचे मंदिर पेशवेकालीन असून साळवणदेवी तालुक्यातील प्रसिद्ध देवी आहे. श्रीगोंदा शहरापासून साळवणदेवीचे मंदिर अवघे तीन कि.मी. अंतरावर आहे. सातव्या माळेला येथे यात्रौत्सव साजरा केला जातो.कोळगाव येथील कोळाई देवीचे डोंगरावर मंदिर आहे. सातव्या माळेला भाविकांची मोठी गर्दी होते. काही भक्त दहा दिवस मंदिरात देवीच्या सानिध्यात राहतात. पिंपळगाव पिसा येथील रेणुकामाता देवीच्या दर्शनासाठी रोज पहाटे गर्दी होते. येथे येणाऱ्या महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. थिटे सांगवीत पद्मावती देवीच्या दर्शनासाठी घोगरगाव, बनपिंपरी, सांगवी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतात. विजयादशमीच्या एक दिवस अगोदर येथे यात्रा भरते. रायगव्हाण येथे पद्मावती देवीचे पुरातन मंदिर आहे. रायगव्हाण परिसरातील दहा ते बारा गावांमधील भाविक दर्शनासाठी येतात. पेडगाव किल्ल्याशेजारी महादजी शिंदे यांनी भवानी मातेचे मंदिर बांधले आहे. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. (तालुका प्रतिनिधी)