शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:12 IST

कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे.

मिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

 

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयारमिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत