शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टातील कर्मचा-यानेच मारला पैशावर डल्ला : संगमनेर तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 12:05 IST

 संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

घारगाव :  संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक पोस्टातील कर्मचा-यानेच ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मांडवे बुद्रूक पोस्टाच्या शाखेतील डाकपालाने वीस हजार दोनशे चौदा रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे पोस्टाचे कार्यालय आहे. या पोस्टात ग्राहकांनी सुकन्या समृद्धी योजना व ग्रामीण डाक जीवन विमा पॉलिसी योजना मध्ये १४ फेब्रुवारी २०१७ ते २७ डिसेंबर २०१७ च्या दरम्यान वीस हजार दोनशे चौदा रुपये कार्यालयातील डाकपाल पांडुरंग नामदेव केदार (रा.मांडवे बुद्रूक, ता.संगमनेर) यांच्याकडे जमा केले होते. पोस्ट खात्यात पैसे जमा केल्यानंतर केदार यांनी पासबुकमध्ये पैसे भरल्याची तारीख व किती पैसे भरले यांची नोंद शिक्का मारून दिली होती. मात्र, जमा झालेल्या रकमेची नोंद शाखा कार्यालय खात्यात न करता, तसेच रक्कम शासन खात्यात जमा न करता शासनाची व खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप केदार यांच्यावर करण्यात आला आहे. पोस्ट खात्याच्या चौकशी अंती ही बाब लक्षात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी कार्यालयीन चौकशीत पांडुरंग केदार हे दोषी आढळल्याने घारगाव पोलीस ठाण्यात संतोष सुरेश जोशी (सहायक अधीक्षक, डाकघर संगमनेर उपविभाग)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी.एस.वायळ करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर