राहुरी : मुळा धरण येत्या दहा दिवसात भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज मुळा धरणाकडे ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा होत आहे. त्यामुळे मुळा धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धरणात सध्या २१,१७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात १६,४७० दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा उजवा व डावा कालवा बंद आहे. कोतुळ येथे आत्तापर्यंत ३६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर मुळानगर येथे ६३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतुळ येथून पाण्याची आवक धरणाकडे सुरू आहे. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभ क्षेत्रावर गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. हरिश्चंद्रगडावर पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाकडे पाण्याची आवक सुरू आहे. येत्या चार दिवसांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.