पारनेर : पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार असून बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला.निवडणुकीत दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारनेरचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतर पारनेर बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सभापती अरूण ठाणगे, माजी सभापती गंगाराम बेलकर हजर होते. तीन आॅगस्टपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. छाननी पाच आॅगस्टला होईल. २५ व २६ आॅगस्ट रोजी अर्ज माघारी घेता येईल. २७ आॅगस्ट रोजी चिन्हाचे वाटप होईल. अठरा सप्टेंबरला मतदान व दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल. या निवडणुकीत आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे व समविचारी लोकांचे शेतकरी विकास मंडळ व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, जिल्हा बँकेचे उदय शेळके यांचे मंडळ अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
पारनेर बाजार समितीसाठी १८ सप्टेंबरला मतदान
By admin | Updated: July 21, 2016 23:55 IST