शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये उद्या मतदान : १८ लाख मतदार बजावणार हक्क, २०३० केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 18:43 IST

अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण २०३० केंद्रांवर मतदान होणार आहे. भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही मतदानाची वेळ असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील २०३० मतदान केंद्रांवर १८ लाख ५४ हजार २४८ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) सोमवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. निवडणुकीसाठी ४ हजार २६३ बॅलेट युनिट, २ हजार ४३६ कंट्रोल युनिट व २ हजार ६३९ व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह मुख्य निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन, पोलीस विभागासाठीच्या निवडणूक निरीक्षक भवानीश्वरी यांनीही मतदान साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. या मतदारसंघात एकूण १८ सखी मतदान केंद्र असणार आहेत. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत.मतदानाच्या दिवशी औद्योगिक आस्थापनांना सुटीमतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदेशित केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019