शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नगराध्यक्ष निवडीचे राजकारण तापले

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षांनी निवड शुक्रवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

अहमदनगर: जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्षांनी निवड शुक्रवारी होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अंतर्गत गटबाजीने पक्षाचे प्रमुखही पेचात सापडले आहे. नगराध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता नागरिकांना लागली असून नाव अंतिम करताना पक्ष प्रमुखांचीही कसरत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा राजकीय आढावा...राहुरीत उषाताई तनपुरे निश्चित, देवळालीत उत्सुकता राहुरी व देवळाली नगरपरिषद नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षदी कुणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ १८ जुलै रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. राहुरी नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी, तर देवळाली प्रवरा मागासवर्गीयासाठी राखीव आहे़ राहुरी नगरपरिषदेत जनसेवा मंडळाचे १६, नागरी विकास मंडळाचे ३ व अपक्ष १ असे बलाबाल आहे़ नगराध्यक्षपदासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. उषाताई तनपुरे यांचे नाव निश्चित आहे़ त्यामुळे अन्य कुणीही नगराध्यक्षपदासाठी दावा केलेला नाही़ उपनगराध्यक्ष पदासाठी कुणाचेही नाव अद्याप निश्चित झालेले नाही़ इच्छुकांमध्ये राजेंद्र उंडे, भारी सरोदे, सोनाली उदावंत, अर्चना तनपुरे यांची नावे चर्चेत आहेत़ विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याने नगराध्यक्षपदी सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या उमेदवाराची बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता आहे़ देवळाली नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे ५, राष्ट्रवादी पुरस्कृत २, काँग्रेसचे ५, तर भाजपचे ६ नगरसेवक आहेत़ काँगे्रस व राष्ट्रवादी सत्तेत आहे़ नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती त्रिभुवन यांचे नाव चर्चेत आहे़ शिवाय भाजपतर्फे सुरेंद्र थोरात इच्छूक आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी अनंत कदम व ज्योती गिरमे यांची नावे पुढे येऊ शकतात. राहुरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून गयाबाई ठोकळे, तर उपनगराध्यक्ष म्हणून दिनकर पवार यांनी काम पाहिले आहे. देवळाली नगर परिषदेत मंदाकिनी कदम नगराध्यक्ष, तर उपनगराध्यक्ष म्हणून शुभांगी पठारे कार्यरत होते. कोपरगावचे नगराध्यक्षपद नशिबावरकोपरगाव नगराध्यक्षपदाची निवड जवळ येऊन ठेपली तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे़ समान संख्याबळाच्या खेळामुळे पुन्हा चिठ्ठी टाकून नगराध्यक्ष निवडला जातो, की काळे-कोल्हे गटात फोडाफोडीचे राजकारण होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ कोपरगाव नगरपालिकेत कोल्हे गटाचे ११, काँग्रेस व भाजपा प्रत्येकी एक असे मिळून सत्ताधारी पक्षाचे तेरा, तर आ़ काळे यांच्या जनविकास आघाडीचे तेरा असे समसमान संख्याबळ आहे़ अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यावेळी कोल्हे गटाचे नशीब बलवत्तर होते़ दोन्ही पदे त्यांना मिळाली. येत्या आठ दिवसांत पुन्हा नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे़ खुल्या संवर्गातील महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे़ नगराध्यक्षपदाची उमेदवारी आपल्या पत्नीस मिळावे, यासाठी नवरोबांच्या खेट्या काळे-कोल्हेंच्या दरबारी सुरू आहेत. सत्ताधारी गटाकडून विजया देवकर, सिंधूताई कडू, संगीता रूईकर, शोभा पवार, अलका लकारे, सुनीता जगदाळे या प्रयत्नशील असून उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर (काँग्रेस) व भारती वायखिंडे (भाजप) यांनी अडीच वर्षांपासून कोल्हे गटाला पाठिंबा दिलेला असल्याने त्याही या पदावर आपला दावा सांगत आहेतक़ाळे गटाकडून ऐश्वर्या सातभाई, वैशाली आढाव, सपना मोरे, पद्मावती बागूल व सिंधूताई शिंगाडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत़ आमचे नगरसेवक एकसंघ आहेत, असे काळे आणि कोल्हे गटाकडून सांगण्यात येत असले तरीही एकमेकांचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत़ तसे झाले तर सत्ता कुणाच्या तरी एकाच्या ताब्यात येईल, अन्यथा पुन्हा चिठ्ठ्यांच्या खेळात कोण ‘लकी लेडी’ सिद्ध होते, याकडे शहरवासियांचे लक्ष असेल. नगराध्यक्ष निवडीला अंतर्गत गटबाजीचे ग्रहणपाथर्डी नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या पदावर प्रियंका काळोखे की राजेंद्र उदमले विराजमान होणार हे राजीव राजळे यांच्यावर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. काळोखे किंवा उदमले यापैकी कोणीही नगराध्यक्ष झाले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्याच हातात पालिकेच्या चाव्या रहातील असे बोलले जात आहे.पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता असून अंतर्गत गटबाजीमुळे पालिके चे वातावरण नेहमीच तापलेले असायचे. पालिकेत एकूण सतरा नगरसेवक असून पालिका निवडणुकीत राजीव राजळे व आमदार चंद्रशेखर घुले यांनी एकत्रित प्रचार करून बारा नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आणले. उर्वरित पाच पैकी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके यांच्या रामगीरबाबा आघाडीचे तीन तर प्रताप ढाकणे यांना मानणारे दोन नगरसेवक आहेत.अलीकडील काळात प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना मानणारे डॉ.दीपक देशमुख व डॉ.शारदा गर्जे या सुध्दा राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ १४ झाले आहे.परंतु राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे नगराध्यक्ष नेमका कोणाच्या गटाचा होणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे.आ. घुले व ढाकणे हे दोन्ही युवा नेते एकाबाजूला तर राजीव राजळे हे दुसऱ्या बाजूला अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे त्यामुळे नगराध्यक्ष कोणाच्या गटाच्या यालाही महत्व येणार आहे.सध्याच्या संख्याबळानुसार विचार करता राजळे हे सांगतील तोच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट असले तरी विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांनी आ.पंकजा मुंडे यांची भेट घेतली असल्याचे समजते.चालू महिन्यात त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जाते. पालिकेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काळोखे व उदमले हे याच प्रवर्गाचे आहेत. येत्या १८ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजीव राजळे हे कोणाच्या नावाला हिरवा कंदील देतात यावर निवड अवलंबून आहे.अडीच वर्षासाठी हे पद असल्याने सव्वा ,सव्वा वर्ष काळोखे व उदमले यांना संधी मिळू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.काळोखे व उदमले हे दोघेही विद्यमान नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचेच समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पालिकेच्या चाव्या आव्हाड यांच्याच हातात रहाणार हे स्पष्ट असून त्यांचीच मोहोर पालिकेच्या राजकारणावर रहाणार हे निश्चित .