शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भाजीवाले, गाळेधारक, स्थानिक रहिवासी यांना वेठीस धरत श्रेयासाठी राजकारण-काँग्रेसचा  आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:52 IST

अहमदनगर : मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी, फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करीत ...

अहमदनगर : मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी, फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करीत वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये निव्वळ श्रेय लाटण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा घाणाघाती आरोप, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काळे यांनी म्हटले आहे की, प्रोफेसर चौकातील गोरगरीब भाजी - फळ विक्रेत्यांवरील अन्यायकारक कारवाई विरोधात शहरातील काँग्रेस धावून गेली. मात्र यामुळे काही मंडळींच्या पोटात पोटशूळ उठला. यामुळे काही मंडळी पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. हा प्रश्न सोडविण्याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी ते जरूर घ्यावं. त्याबाबत आमची काही हरकत नाही. पण श्रेयासाठी राजकारण करत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे पाप कुणी करू नये.

 

काळे म्हणाले की,  हा चौक रहदारीचा चौक आहे. या चौकामध्ये अनेक गाळेधारकांनी मोठ्या रकमांचे बँकांकडून कर्ज काढून गाळे घेतले आहेत. गाळेधारकांचे आणि भाजी - फळ विक्रेत्यांचे मध्यंतरी काही कारणावरून वाद झाले होते. काँग्रेस पक्षाने यशस्वी मध्यस्थी करत सामंजस्याने तोडगा काढत भाजीवाल्यांना कृष्ठधाम रोडवरील मोकळ्या जागेमध्ये बसवण्याचा पर्याय समोर ठेवला होता. गाळेधारक, स्थानिक रहिवाशांसह त्याला अनेक भाजी विक्रेत्यांनी सहमती दर्शवली होती. 

महापौर यांनी देखील तोडगा मान्य करत मनपा अतिक्रमण विभाग यापुढे त्रास देणार नाही अशी सर्वांसमोर ग्वाही दिली होती. मात्र तोंडावर गोड बोलून पडद्या मागून या सर्वांना त्रास देत त्यांना वेठीस धरत राजकारण केले जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

दरबारात हजेरी लावावी म्हणून षडयंत्र

हा सगळा डाव भाजी - फळ विक्रेते, गाळेधारक, स्थानिक रहिवासी यांनी काहींच्या दरबारात येऊन विनवणी करावी यासाठीच षडयंत्र रचून केला जात आहे. आधी स्वतः वातावरण चिघळवून प्रश्न निर्माण करायचा. त्यानंतर आमच्यामुळेच हा प्रश्न सोडवला गेला असा कांगावा करीत श्रेय लाटायचे. यासाठीच हा खेळ सुरू असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कुणाचे नाव न घेता केला आहे.  

अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे काहींच्या दावणीला बांधलेले आहेत ही या शहराची शोकांतिका आहे. वास्तविक पाहता या तिन्ही घटकांना एकमेकांपासून त्रास होणार नाही अशा पद्धतीचा काँग्रेसने काढलेला मध्य मार्ग यशस्वी होत असतानाच निव्वळ श्रेयाचे राजकारण करायचे म्हणून याला खो घालत या तीनही घटकांना वेठीस धरण्याचे काम लोकप्रतिनिधी, मनपातील अभद्र युती करत असल्या बद्दल  काळे यांनी तीव्र निषेध केला आहे.

येत्या दोन दिवसात मनपाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता याबाबत सामोपचाराने योग्य तोडगा काढला नाही तर काँग्रेस आक्रमक होत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार